वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचा आदेश मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीनं जारी केला आहे.
तसंच पुढील कार्यवाहीसाठी त्यांना 23 जुलैपूर्वी मसूरी इथं अकादमीत बोलवण्यात आलं आहे. अकादमीनं महाराष्ट्र शासनाला यासंदर्भात पत्र पाठवलं आहे, त्यानुसार राज्य शासनानं खेडकर यांना जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्त केलं असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काल दिली.