डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 24, 2025 1:46 PM | Hyderabad

printer

हैदराबादमध्ये SLBC बोगद्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुटकेचे प्रयत्न

हैदराबादमध्ये SLBC बोगद्यात अडकलेल्या आठ कर्मचाऱ्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु आहेत. कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी उत्तराखंडात झालेल्या अपघातातल्या मजूरांची सुटका करणारे रॅट मायनर्स सुद्धा आ्ल्याचं तेलंगणाचे मंत्री जे कृष्णराव यांनी सांगितलं.  बोगदा कोसळून दोन दिवस झाले आहेत आणि बोगद्याच्या तोंडाशी दगडमातीचा ढिगारा झाल्याने अडकलेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोचणं कठीण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तरीही खोदकाम करणाऱ्या मशिनच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आपण परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचं आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा