अमेरिकेतील विविध राज्यांना हेलेन चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. या वादळामुळं मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या १८३ वर गेली असून, शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत. उत्तर कॅरोलिना राज्यात ९० लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला असला, तरीही फ्लोरिडा ते व्हर्जिनियापर्यतच्या भागातील १३ लाख लोक अंधारात आहेत. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आज उत्तर कॅरोलिनाला भेट देणार असून, त्यांनी उत्तर कॅरोलिना भागात लोकांना अन्न, पाणी पुरवण्याच्या कामात मदत करण्यासाठी १,००० सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस आज जॉर्जियाला भेट देणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जॉर्जियाला भेट दिली.
Site Admin | October 3, 2024 10:34 AM | Hurricane Helene