डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 3, 2024 2:36 PM

printer

कॅरिबियन भागात बेरील चक्रीवादळामुळे सहा लोकांचा बळी

कॅरिबियन भागात धडकलेल्या बेरील चक्रीवादळामुळे सहा लोकांचा बळी गेला असून यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हे चक्रीवादळ श्रेणी ४ प्रकारचं असून ते ताशी १५५ मैल वेगानं जमैकाच्या दिशेने जात असल्याचं राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्रानं सांगितलं आहे. त्यामुळे आज जमैका आणि केमनबेटांच्या काही भागांमध्ये वेगवान वारे, वादळी हवामान आणि विनाशकारी लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

 

बेरील चक्रीवादळामुळे विश्वविजेत्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा बार्बाडोस इथून परतीचा प्रवास लांबणीवर पडला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हा संघ काल संध्याकाळी बार्बाडोस इथून निघणार होता. पण त्यांना चक्रीवादळामुळे हॉटेलमध्येच थांबावं लागलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा