चिडो चक्रीवादळानं मादागास्कर आणि मोझांबिक किनाऱ्यादरम्यान असलेल्या मायोट या फ्रान्सच्या बेटाला जबरदस्त तडाखा दिला असून, इथं हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वीस लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली असली, तरी स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते बळींची संख्या एक हजार किंवा त्याहून अधिक असण्याची शक्यता आहे. ताशी 225 किमी वेगाने वारे असलेले आणि आठ मीटर उंचीच्या लाटांसह हे शक्तिशाली वादळ शनिवारी या भागात धडकलं. त्यामुळं मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, वीजपुरवठा खंडीत झाला आहे. या बेटावरील हा 90 वर्षांतील सर्वांत भीषण आघात आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन राष्ट्रीय शोक कालावधी जाहीर करण्याची घोषणा केली आहे. उच्च राहणीमान आणि फ्रान्सच्या कल्याणकारी योजनामुळं कोमोरोस आणि सोमालिया सारख्या शेजारील देशांतील लोक मोठ्या प्रमाणात या बेटावर स्थलांतरित होत असतात.
Site Admin | December 17, 2024 10:14 AM | Cyclone Chido