मानवी हक्कांच्या संरक्षण आणि संवर्धनात भारतानं नेहमीच सक्रिय भूमिका बजावली आहे असं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. जिनिव्हा मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या ५८ व्या अधिवेशनाला त्यांनी काल दूरस्थ पद्धतीनं संबोधित केलं. भारताचा दृष्टिकोन आपल्या भागीदारांच्या प्राधान्यक्रमानुसार, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा बळकट करण्यावर केंद्रित आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. भारतानं नेहमीच दहशतवाद सहन करण्याला विरोध केला आहे. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारताची भूमिका नेहमीच ठाम राहिली आहे, यावर त्यांनी भर दिला. समकालीन जागतिक वास्तवाचं प्रतिबिंब उमटवणाऱ्या बहुपक्षीय प्रणालीची तातडीची गरज असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं.
Site Admin | February 25, 2025 9:52 AM | Human Rights | India
मानवी हक्कांच्या संरक्षण आणि संवर्धनात भारत सक्रिय – मंत्री डॉ. एस. जयशंकर
