यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी भरघोस तरतूद केली असून राज्यातल्या अनेक रेल्वे प्रकल्पांची कामं हाती घेतल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी दरवर्षी सरासरी १ हजार १७१ कोटी रुपयांची तरतूद होत होती. गेल्यावर्षी ही तरतूद साडे १३ हजार कोटींहून अधिक होती, असं ते म्हणाले. युपीएच्या काळात सरासरी ५८ किलोमीटरचे रेल्वेमार्ग बांधले गेले. गेल्या १० वर्षात हे प्रमाण सरासरी १८३ किलोमीटरपर्यंत वाढल्याची माहिती त्यांनी दिली. वडसा-गडचिरोली रेल्वे प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित केली असून काम सुरू असल्याचं लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं.
Site Admin | July 24, 2024 6:48 PM | Ashwini Vaishnav | Budget Session 2024