व्हेनेझुएला मधे एक्स समाजमाध्यमावर १० दिवस बंदी घालण्यात आली आहे. गेल्या २८ जुलैला व्हेनेझुएलामधे झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत द्वेषभावना पसरवल्याचा आरोप तिथले अध्यक्ष मादुरो यांनी एक्स चे मालक एलॉन मस्क यांच्यावर केला आहे. आपल्या विरोधकांनी राजकीय अराजक माजवण्यासाठी एक्स माध्यमाचा वापर केल्याचा आरोपही मादुरो यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पुढचे १० दिवस व्हेनेझुएलात एक्स वर बंद राहील.
Site Admin | August 10, 2024 2:28 PM | एक्स समाजमाध्यम | बंदी | व्हेनेझुएला
व्हेनेझुएला मधे एक्स समाजमाध्यमावर १० दिवस बंदी
