CISF अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातल्या पूर्णपणे महिलांचा समावेश असलेल्या पहिल्या बटालियनला केंद्रीय गृहमंत्रालयानं आज मंजुरी दिली. CISF च्या ५३ व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले होते. सध्या यात दलात ७ टक्के महिला आहेत. नव्या बटालियनची भरती, प्रशिक्षण आणि मुख्यालयासाठी CISF नं काम सुरू केलं आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेतल्या कमांडोपासून विमानतळ आणि मेट्रोच्या सुरक्षेचं कामही करू शकतील, असं प्रशिक्षण या महिलांना दिलं जाणार आहे.
Site Admin | November 12, 2024 8:32 PM | CISF
CISF मध्ये पूर्णपणे महिलांचा समावेश असलेल्या पहिल्या बटालियनच्या स्थापनेला केंद्रीय गृहमंत्रालयाची मंजुरी
