दहशतवाद विरोधातली संरचना बळकट करण्यासाठी NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्था आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकांमध्ये सहकार्य आणि समन्वय वाढण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेत बोलत होते.
जम्मू-काश्मीर, कट्टर डावी विचारसरणी आणि आणि ईशान्य भारतातील राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित समस्या सोडवण्याच्या अनुषंगानं झालेल्या प्रगतीबद्दल तसंच माओवादा विरोधातल्या प्रयत्नांमध्ये यश मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ज्या राज्यांनी सशस्त्र गटांनी व्यापलेली क्षेत्र मुक्त करण्यात यश मिळवलं आहे, त्यांनी सतर्क राहावं असंही त्यांनी सुचवलं.
भारताला 2047 पर्यंत समृद्ध, मजबूत आणि विकसित भारत बनवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं पूर्ण करण्यासाठी राज्यांच्या पोलीस महासंचालकांनी काम करावं असं आवाहनही त्यांनी केलं.