केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते गांधीनगर इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. अहमदाबाद महानगरपालिकेच्या सुमारे ४४६ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी देखील शाह करतील. साणंद इथं ते भाजपा कार्यकर्ता संमेलनात भाग घेतील. त्याचप्रमाणे गुजरात पर्यटन महामंडळातर्फे आयोजित व्हायब्रंट गुजरात नवरात्री उत्सवाचं उद्घाटन करतील.
अहमदाबादमधल्या इतर नवरात्रौत्सव मंडळांच्या कार्यक्रमांनाही ते भेट देतील.