डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मणिपूरमधे ८ मार्चपासून सर्वांना मुक्तपणे वावरता येण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे निर्देश

मणिपूरमधे येत्या ८ मार्च पासून सर्व रस्त्यांवर सर्वांना मुक्तपणे वावरता यावं याची काळजी घेण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिले. मणिपूरमधल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल अजयकुमार भल्ला यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

 

रस्त्यांवर वाहतुकीला अडथळे आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसंच मणिपूरमधल्या आंतरराष्ट्रीय सरहद्दीलगत कुंपण घालण्याचं काम लौकरात लौकर पूर्ण करावं असं त्यांनी सांगितलं. मणिपूरला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अमलीपदार्थ व्यापाराचं जाळं उद्ध्वस्त करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले.

 

मणिपूरमधे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मणिपूरमधे राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर ही पहिलीच आढावा बैठक होती.   

सर्वाधिक वाचले

सर्व पहा