केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मध्यप्रदेशातल्या इंदोर शहरात एक पेड माँ के नाम या अभियानाचा शुभारंभ केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची घोषणा केल्यावर जनतेनं त्या आवाहनाला प्रतिसाद दिला असल्याचं शहा यावेळी म्हणाले. इंदोरची ओळख स्वच्छ शहराबरोबर हरित शहर अशी होत असल्याचं त्यांनी सांगितलं. इंदोरनं एका दिवसात ११ लाख रोपांची लागवड करून जागतिक विक्रम केला आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी आज अन्य एका कार्यक्रमात मध्यप्रदेशमधल्या सर्व ५५ जिल्ह्यांतल्या प्रधानमंत्री उत्कृष्टता महाविद्यालयांचं उदघाटन केलं.
Site Admin | July 14, 2024 7:59 PM | Amit Shah | Ek Ped Maa Ke Naam