डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केंद्रीय मंत्री अमित शाह जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर

केंद्रीय मंत्री अमित शाह यांचं तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यासाठी जम्मू इथं आगमन झालं. ते आज कठूआ जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील. तसंच, ते विनय या आंतरराष्ट्रीय हद्दीलागत असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या नाक्याला भेट देणार आहेत. त्यानंतर ते जम्मूमधील राज भवन इथं हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबियांची भेट घेतील. कठूआ इथं 23 मार्च रोजी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत चार पोलिसांना मरण आलं होतं. आज दुपारी ते श्रीनगरकडे रवाना होतील. तिथे ते उद्या जम्मू आणि काश्मीरमधील विकास प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा