मणिपूरमधे योग्य वेळी राष्ट्रपती राजवट लावण्यात आली असून राज्य आधीपेक्षा जास्त शांत झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. काल रात्री एका माध्यम संस्थेच्या परिषदेला ते संबोधित करत होते. राज्यात शांतता कायम करण्याच्या दृष्टीने सरकार मैतेई आणि कुकी समुदायाशी चर्चा करत आहे. सकारात्मक गोष्टी घडत असून चिंता करण्याचं कारण नाही असं गृहमंत्री म्हणाले. मणिपूरला वांशिक हिंसाचार नवीन नसून याआधीही असा हिंसाचार तीन ते चार वर्षे झाला आहे, असं गृहमंत्री म्हणाले.
दरम्यान, गृहमंत्री अमित शहा आज दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते गोपालगंज इथं जाहीर सभा आणि पाटणा इथल्या राज्यस्तरीय सहकार परिषदेसह अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.