भारतीय न्याय संहिता कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज ईशान्येकडच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. दिवसाच्या सुरुवातीला ते कोक्राझार इथं ऑल बोडो स्टुडन्ट्स युनियनच्या ५७ व्या वार्षिक परिषदेला संबोधित करतील. त्यानंतर ते दुपारी गुवाहाटीला पोहोचतील. तिथे ते आसाम, मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड आणि सिक्किमच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. मणिपूरमधे राष्ट्रपती शासन लागू असल्याने तिथून बैठकीला कोण उपस्थित राहणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, शहा काल मिझोराम इथं आसाम रायफलच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Site Admin | March 16, 2025 1:34 PM | Home Minister Amit Shah
भारतीय न्याय संहिता कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री शाह यांची बैठक
