डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अंमली पदार्थांच्या तस्करांना कडक शासन करण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध-गृहमंत्री

देशभरातल्या वेगवेगळ्या १२ प्रकरणातल्या २९ अंमली पदार्थ तस्करांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. देशात वरपासून खालपर्यंत चालवण्यात आलेल्या शोध मोहीमेत या सर्वांना पकडण्यात आलं होतं. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे देशातल्या युवकांचे आयुष्य खराब होत असल्यानं अंमली पदार्थांच्या तस्करांना कडक शासन करण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा