डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यस्तरीय सहकार परिषदेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांचं संबोधन

केंद्र सरकारनं भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्राम विकास, कृषी क्षेत्र तसंच पशुसंवर्धन क्षेत्राचं परस्पर सामायिक दृष्टीकोनातून एकात्मिकरण घडवून आणलं असल्याचं केंद्रीय गृह तसंच सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज मध्यप्रदेशात भोपाळ इथं आयोजित राज्यस्तरीय सहकार परिषदेला संबोधित केलं. केंद्र सरकारने सहकार क्षेत्रांच्या नियमांचं मानकीकरण केलं, आणि त्या अंतर्गतचे नियम सर्व राज्यांनी स्वीकारले अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे सहकार क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली असल्याचं ते म्हणाले. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळेच सहकार क्षेत्रात हे बदल घडून आले असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

या परिषदेअंतर्गत मध्य प्रदेश दूध संघ आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामध्ये राज्यातल्या सहकारी दूग्ध संस्थांची संख्या वाढवण्यासंबंधीचा सामंजस्य करारही केला गेला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा