३१ मार्च २०२६ पूर्वी छत्तीसगडसह संपूर्ण देशातून नक्षलवाद संपुष्टात येईल असं प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. छत्तीसगडमधील रायपूर इथं आढावा बैठकीत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं सांगताना कोणत्याही परिस्थितीत नक्षलविरोधी मोहिमेची गती कमी होणार नसल्याचं शहा यावेळी म्हणाले.
Site Admin | April 6, 2025 9:52 AM | Home Minister Amit Shah
३१ मार्चपूर्वी देशातून नक्षलवाद संपुष्टात येईल – गृहमंत्री अमित शाह
