मुंबईकरांनी होलिका दहन आणि धूलिवंदन हे सण आनंदानं आणि जबाबदारीनं साजरे करावेत. होलिका दहनासाठी वृक्षतोड करू नये, तसंच प्रदूषण टाळण्यासाठी रंगवलेलं लाकूड, प्लास्टिक, रबर, टायर अश्या वस्तू होळीत टाकू नये, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे.
रंगांचा उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्यावी, पाण्याचा अपव्यय टाळावा, पर्यावरणपूरक आणि त्वचेसाठी सुरक्षित असलेले नैसर्गिक रंग वापरावेत, अशी सूचनाही पालिकेनं दिली आहे.