हर घर तिरंगा अभियानांतर्गत लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ध्वज फडकावून या उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्ह्यातल्या शासकीय, निमशासकीय कार्यालयांवर काल तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.
हिंगोली इथं नगर परिषदेचे मुख्यधिकारी अरविंद मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. विविध कार्यालयातले अधिकारी कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचं वितरणही करण्यात आलं.
मराठवाडा विभागातल्या हर घर तिरंगा मोहिमेविषयीची माहिती श्रोत्यांना आज सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी आकाशवाणीवरच्या प्रासंगिक या कार्यक्रमात ऐकता येईल.
छत्रपती संभाजीनगर इथंही महानगरपालिकेच्यावतीनं तिरंगा यात्रा कढण्यात आली. शहरातल्या क्रांती चौक ते संत एकनाथ रंगमंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेमध्ये विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सैनिकी गणवेश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. वेरूळ इथं काल शालेय विद्यार्थ्यांनी शंभर फूट लांबीच्या तिरंग्यासह प्रभातफेरी काढली.