आगामी ‘आशियाई महिला हॉकी अजिंक्यपद स्पर्धा २०२४’ साठी १८ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी सलीमा टेटे संघाचं नेतृत्व करणार असून, नवनीत कौर उपकर्णधार आहे. बिहार मधील राजगीर हॉकी मैदानावर येत्या ११ ते २० नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेतील सामने खेळले जाणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशीच भारतीय संघाचा पहिला सामना मलेशिया संघाशी होणार आहे.
Site Admin | October 29, 2024 10:55 AM | Hockey
आशियाई महिला हॉकी स्पर्धेसाठी १८ खेळाडूंचा संघ जाहीर
