हॉकी इंडिया २०२४मधल्या सामन्यांचं उत्तम प्रसारण केल्याबद्दल प्रसारभारतीला जमनलाल शर्मा पुरस्काराने गौरवण्यात आलं. हॉकी इंडियाचा सातवा वार्षिक पुरस्कारवितरण सोहळा काल नवी दिल्ली इथं झाला. त्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार १९७५ मधे विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार सविता पुनिया आणि हरमनप्रीत सिंग यांना देण्यात आला, तर सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून पी आर श्रीजेशला सन्मानित करण्यात आलं. यंदा भारतीय हॉकीचं शताब्दी वर्ष असून १९७५ मधे प्रथम विश्वचषक मिळवल्याला ५० वर्ष पूर्ण होत असल्याने हा सोहळा विशेष थाटामाटाने पार पडला.
Site Admin | March 16, 2025 1:04 PM | Hockey India | Prasarbharati
हॉकी इंडिया २०२४मधल्या सामन्यांचं उत्तम प्रसारण केल्याबद्दल प्रसारभारतीचा गौरव
