हॉकी इंडिया लीगच्या सलामीच्या सामन्यात दिल्ली एसजी पाईपर्स या संघाने गोनसिका संघाला हरवलं. ओदिशातल्या राऊरकेला इथं काल झालेला हा सामना संपला तेव्हा दोन्ही संघांनी दोन – दोन गोल करुन बरोबरी साधली होती. मात्र शूटआऊटवरुन झालेल्या अंतिम निकालानुसार दिल्ली एसजी पाईपर्सने गोसनिकाला ४-२ अशी मात दिली.
या मालिकेत आज हैदराबाद तूफान आणि श्राची रार बेंगाल टाईगर्स यांच्यातील सामना संध्याकाळी सहा वाजता खेळला जाईल. तर रात्री सव्वाआठला सूरमा हॉकी क्लब आणि तामिळनाडू ड्रॅगन्स यांच्यामधला सामना सुरु होईल.
Site Admin | December 29, 2024 3:18 PM | Hockey India