भारतीय हॉकी संघटनेच्या वतीन आयोजित साखळी सामन्यात, काल तामिळनाडू ड्रॅगन्सनं युपी रूद्रास संघाचा 2-0 ने धुव्वा उडवत पहिल्या विजयाची नोंद केली. त्यामुळे गुणतालिकेत तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे. अभारन सुदेव आणि थॉमस सॉर्स्बी यानं तामिळनाडूसाठी प्रत्येकी एक गोल केला. तत्पुर्वी झालेल्या सामन्यात सूरमा हॉकी क्लबने गतविजेत्या वेदांत कलिंगा लान्सर संघाचा 4-3 असा पराभवर केला. आज संध्याकाळी सूरमा हॉकी क्लबचा सामना दिल्ली एसजी पायपर्सशी होणार आहे.
Site Admin | January 6, 2025 10:32 AM | Hockey India League