ओमानची राजधानी मस्कत इथं आजपासून कनिष्ठ महिला आशिया हॉकी कप स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात चीननं बांगलादेशचा १९ – ० असा दणदणीत पराभव केला. भारतीय महिला संघाचा पहिला सामना ज्योती सिंह हिच्या नेतृत्वाखाली उद्या बांगलादेशाच्या संघाबरोबर होणार आहे.
पुढच्या वर्षी चिली देशात होणाऱ्या एफआयएच कनिष्ठ हॉकी विश्व कप स्पर्धेची पात्रता फेरी म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १५ तारखेला होणार असून स्पर्धेतले सर्वोत्तम ५ संघ कनिष्ठ विश्व कप स्पर्धेसाठी पात्र ठरतील.