भारतात एच.एम.पी.व्ही म्हणजेच ह्युमन मेटान्यूमोव्हायरसने बाधित आणखी दोन रुग्ण आढळून आले असले, तरी काळजी करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे. हा विषाणू नवीन नाही, तसंच त्यामुळे सौम्य स्वरूपाचा संसर्ग होतो, असं त्यांनी समाज माध्यमवरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी हात स्वच्छ धुणे हा एक उपाय असून, एखादा रोगजनक विषाणू आढळून आल्यावर घाबरून जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. इन्फ्लूएंझा आणि गंभीर स्वरूपाच्या श्वसन रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंपैकी सुमारे 3 टक्के वाटा एचएमपीव्हीचा असल्याचं प्रयोगशाळेतल्या चाचणी दरम्यान, आढळून आल्याचं आयसीएमआर, अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हटल्याचं त्यांनी सांगितलं. २००१ साली एच.एम.पी.व्ही या विषाणूचा शोध लागला.
खोकला, ताप, सर्दी आणि धाप लागणे, ही या विषाणूच्या संसर्गाची लक्षणं आहेत.
Site Admin | January 7, 2025 2:52 PM | HMPV | World Health Organization scientist