केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा उद्या, दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करणार आहेत. दिल्लीत सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रे, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचे वितरण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. नव्याने स्थापन झालेल्या बहुउद्देशीय संस्थांमध्ये पतसंस्था, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचा समावेश आहे.
Site Admin | December 24, 2024 7:49 PM | HM Amit Shah