मतदारांपर्यंत मतदानाच्या चिठ्या वेळेवर द्याव्यात. मतदारयादीसंबधिच्या तक्रारींचा तातडीनं निपटारा करावा अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिरदेश यांनी दिल्या ते आज संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातल्या सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक तयारीच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक काळात पारदर्शकता जपण्याच्या तसचं प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या प्रतिनिधींना माहिती द्यावी. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करावे. मतदारांना मतदान करणे सोईचे व सुलभ व्हावे यासाठी उपाययोजना राबवाव्या. मतदानाचे प्रमाण नेमके कळावे व त्यातील आकडेवारीत अधिक अचूकता यावी यासाठी या निवडणूकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नेमणूक आदी सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या.