देशभरात आज राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा केला जात आहे. १४ सप्टेंबर १९४९ रोजी संसदेनं हिंदीला राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिला होता. तेव्हापासून आजचा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशवासीयांना एका व्हिडीओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
हिंदी भाषा ही भारताचा अभिमान आणि परंपरा असल्याचंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. या भाषेला वगळून प्रगती शक्य नाही असंही ते म्हणाले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही हिंदी भाषा दिनानिमित्त एक व्हिडीओ संदेश जारी केला असून त्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषा स्विकारली गेली पाहिजे असं म्हटलं आहे.