शिर्डी इथल्या साईबाबा मंदिराला सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल किंवा सीआयएफएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सुरक्षा पुरवण्याबाबत शिफारस करण्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. राज्याचे निवृत्त मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असतील. ३० नोव्हेंबर पर्यंत याबाबतचा गोपनीय अहवाल समितीला न्यायालयात दाखल करावा लागणार आहे.
साईबाबा मंदिराला सीआरपीएफ किंवा सीआयएसएफची सुरक्षा पुरवावी अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी न्यायालयात दाखल केली होती.