चित्रपट अभिनेता अल्लू अर्जूनला हैदराबाद उच्च न्यायालयानं चार आठवड्यांचा हंगामी जामीन मंजूर केला आहे. हैदराबादमधे चित्रपटाच्या प्रिमिअरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी आज त्याला अटक झाली होती.
अल्लू अर्जूनला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयानं त्याला १४ दिवसांची रिमांड दिली होती. हा गुन्हा रद्द करावा, यासाठी अर्जूननं लगेच उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याच्या अर्जाची सुनावणी करताना उच्च न्यायालयानं ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला हंगामी जामीन मंजूर केला.