बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या चकमक प्रकरणी पाच पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेशही उच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी झाली. शिंदे याच्या मृत्युप्रकरणात आरोपी पोलिसांवर गुन्हे दाखल न करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवरही उच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. अक्षय शिंदे याचा २३ सप्टेंबर २०२४ रोजी तळोजा तुरुंगातून कल्याण इथे दुसऱ्या एका प्रकरणात चौकशीसाठी नेताना पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता.
Site Admin | April 7, 2025 9:12 PM | High Court of Bombay
बदलापूर चकमक प्रकरणी पाच पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
