हिरो आशिया चषक हॉकी स्पर्धा यावर्षी ऑगस्ट मध्ये बिहारमधे राजगीर इथं होणार आहे. या संदर्भात हॉकी इंडिया आणि बिहार राज्य क्रीडा प्राधिकरण यांच्यात पाटणा इथं सामंजस्य करार करण्यात आला. अलीकडेच बांधण्यात आलेल्या राजगीर हॉकी स्टेडियममध्ये २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा होईल. राजगीर इथं आयोजित केली जाणारी ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल. १२ व्या हिरो आशिया चषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान, जपान, कोरिया, चीन आणि मलेशियासह एकंदर ८ संघ भाग घेतील.