आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली भांगेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या जितेंद्र कामताप्रसाद जैस्वाल याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने भाईंदरमधून अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाखांहून अधिक रुपयांच्या भांगेच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. हा साठा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यातून रेल्वेने ठाणे, पालघरमधल्या पान टपऱ्यांवर विक्रीसाठी आणल्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अंदाज आहे.