झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते, हेमंत सोरेन आज झारखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. राज्यपाल संतोष कुमार गंगवार, आज संध्याकाळी रांची इथे होणाऱ्या शपथविधी समारंभात सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह मेघालय, पंजाब आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री यांना देखील या समारंभाचं आमंत्रण आहे.
शपथविधीसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून रांची शहरातल्या शाळा आज बंद आहेत.