झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल संतोष गंगवार यांनी आज रांची इथल्या मोरहाबादी मैदानावर झालेल्या कार्यक्रमात त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, ज्येष्ठ आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन आपल्या मंत्रिमंडळाची स्थापना करतील. विश्वासदर्शक ठरावानंतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.