झारखंडमध्ये मतदानाच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्या प्रचारसभांंचा धडाका सुरु आहे. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर झारखंडची जनता नाखूश असल्याचा दावा जेष्ठ भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री अन्नपुर्णादेवी यांनी हजारीबाग इथं बोलताना केला. झारखंडमधले अनेक प्रकल्प हे हेमंत सोरेन याच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत पूर्ण झाले आहेत असा दावा झारखंड मुक्ती मोर्चाच्या कल्पना सोरेन यांनी खुंटी इथल्या सभेत बोलताना केला. काँग्रेस, राजद, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन तसंच इतर पक्षही झारखंडच्या विविध भागात सभा घेत आहेत. झारखंडमध्ये या महिन्यात १३ आणि २० अशा दोन टप्प्यात मतदान होत आहे.
Site Admin | November 7, 2024 7:57 PM | Annpurna Devi | Hemant Soren