भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला आज गुजरात मधल्या पोरबंदर विमानतळाच्या धावपट्टीवर झालेल्या अपघातात दोन वैमानिक आणि एका क्रू सदस्याचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर आपला नियमित सराव करत असताना ही दुर्घटना घडली, अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरु झाल्याचं तटरक्षक दलानं सांगितलं.
Site Admin | January 5, 2025 7:42 PM | helicopter crash