डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 27, 2024 1:37 PM | GUJRAT | Rain

printer

गुजरातमध्ये गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत

गुजरातमध्ये गेले दोन दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अहमदाबाद, बडोदा, सुरत आणि नवसारीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गांसह सुमारे ५०० रस्त्यांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. सखल भागातल्या सुमारे १७ हजार रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. राज्यातली ५० हून अधिक धरणं भरून वाहत आहेत. आणंद मार्गे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर इथल्या आप्तकालीन साहाय्य केंद्रात उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. राज्यातल्या प्राथमिक शाळा आज बंद आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा