डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केरळला मुसळधार पावसानं झोडपल्यानं मोठं नुकसान

केरळला मुसळधार पावसानं झोडपल्यानं संपूर्ण राज्यात विशेषतः उत्तर आणि मध्य भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्याच्या डोंगराळ भागात तसंच नदीकाठच्या भागांना देण्यात आलेला अतिदक्षतेचा इशारा अद्यापही कायम आहे. पावसाचा फटका जिल्ह्यांमध्ये मदत शिबिरं सुरू करण्यात आली आहेत. तसंच कन्नूर, कोळीकोड, वायनाड, पलक्कड, त्रिशूर, इडुक्की, अलापुझा आणि कोट्टायम या आठ जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस सुरू असल्यानं तिथल्या सर्व शैक्षणिक संस्थांना प्रशासनानं सुट्टी जाहीर केली आहे.

 

तथापि परीक्षांच्या पूर्वनियोजित वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. पलक्कड आणि इडुक्की ही पर्यटनस्थळं बंद करण्यात आली आहेत तर डोंगराळ भागातून रात्रीच्या वेळी प्रवास करण्यासही मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची नऊ पथकंही राज्यात पोहोचली आहेत. राज्यात पावसामुळं उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी लष्कर, इंडो-तिबेटन दल आणि सीआरपीएफची पथकंही सज्ज आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा