तेलंगणाच्या खम्मम आणि महबुबाबाद या पूरबाधित जिल्ह्यांमध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंत महबुबाबाद इथे १८२ मिलीमीटर तर खम्मममधल्या तल्लाडा इथे १२२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या भागात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांसाठी सावधानतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागानं या दोन जिल्ह्यांसह इतर दोन जिल्ह्यांना येत्या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट तर आणखी दहा जिल्ह्यांना मध्यम पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. आगामी पाच दिवसांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाचे वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
Site Admin | September 8, 2024 1:52 PM | Weather report | Weather Update