अतिवृष्टीने बाधित झालेल्या श्रीलंकेत पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज आहे. श्रीलंकेच्या हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात आग्नेय भागात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिम वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता असल्यामुळे हवामान काहीसे निवळेल. दरम्यान श्रीलंकेत पूरग्रस्तांसाठी राष्ट्राध्यक्ष अनुरा दिस्सानायके यांनी ५० मिलीयन श्रीलंकन रुपयांची मदत मंजूर केली आहे. खराब हवामानामुळे दीड लाख नागरिक संकटात आल्याचं श्रीलंकेच्या आपदा व्यवस्थापन केंद्राने म्हटलं आहे. दहा हजार आपदग्रस्तांनी देशभरातल्या ८० मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.