फेंजल चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, ते आज वायव्येकडे सरकण्याची आणि हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता आहे. मात्र, या चक्रीवादळामुळं केरळ, तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान, फेंजल चक्रीवादळामुळं पुद्दुचेरी इथं गेल्या तीस वर्षांतला सर्वात जास्त पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. ते पूर्वपदावर यायला काही दिवस लागण्याची शक्यता आहे. काल संध्याकाळी पाऊस थांबल्यानंतर बचाव आणि मदत कार्याला वेग आला आहे. भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे.
Site Admin | December 2, 2024 1:36 PM | Heavy rain | Kerala | South Karnataka | Tamil Nadu