हिमाचल प्रदेशातही पावसाचा जोर सर्वदूर कायम असून, ठिकठिकाणी आलेल्या पुरामुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला तर तिघे जण बेपत्ता झाले आहेत. पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. किन्नौर या आदिवासी बहुल जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, पूह ते रोरीक दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचं नुकसान झालं आहे. सिमला जिल्ह्यातल्या चोपाल भागात तारापूर गावात पावसामुळे सफरचंद आणि ऑरकीड फुलांची साठवणूक केलेल्या पेटयांचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच सीमूर जिल्ह्यात यमुना आणि मारकंद या नद्यांना पूर आला असून, येत्या 24 तासात हिमाचल प्रदेशच्या 10 जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Site Admin | August 12, 2024 9:22 AM | Flood | Heavy rain | Himachal Pradesh