बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सुल्तानगंज आणि रतनपूर स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं या मार्गावरील रेल्वे वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून गंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत आहे. गंगा आणि अन्य नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं पटणा, वैशाली आणि बेगूसराय यांसह १२ जिल्ह्यांत पूर आला आहे. याचा फटका १० लाखांहून अधिक नागरिकांना बसला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल पटणा आणि वैशाली या पूरग्रस्त भागाचा दौरा केला.
Site Admin | September 22, 2024 1:57 PM | Bihar | Heavy rain | rain update