हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि देशाच्या ईशान्य भागात उद्यापर्यंत तर पंजाब आणि वायव्य भारतात आज मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
पूर्व आणि ईशान्य भारतात पुढील 5 दिवस वादळ आणि गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा तर कर्नाटकच्या किनारी भागातही काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.