जालना शहरासह जिल्ह्यातल्या मंठा, परतूर तालुक्यात आज दुपारी पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळं खरिप हंगामातल्या पिकांना जीवदान मिळालं आहे. या जोरदार पावसामुळं परतूर तालुक्यातल्या नदी-नाल्यांना पूर आला आहे.
सात-आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर आज दुपारी नाशिक शहरात मुसळधार पावसानं पुन्हा हजेरी लावली. कमी वेळात खूप मुसळधार पाऊस झाल्यानं जागोजागच्या रस्त्यांवर तसंच उड्डाणपूलावर पाणी साठलं होतं.
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या साखरा परिसरात आज दुपारी विजांच्या कडकडाटासह अचानक पावसाला सुरुवात झाली. या दरम्यान शेतकाम करत असताना अंगावर वीज कोसळल्यानं या परिसरातली एक शेतकरी महिला ठार झाली. या दुर्घटनेत तिचे पती गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे .
बुलडाणा जिल्ह्यातही पावसानं पपपपरकआज वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. या दरम्यान मलकापूर तालुक्यातल्या म्हैसवाडी इथल्या एका मजूर महिलेच्या अंगावर विज पडल्यानं तिचा मृत्यू झाला असल्याचं तर १ महिला गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे.