डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडेल, असा असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

 

विदर्भात काही भागात पावसाची संततधार राहणार असून सातारा आणि पुणे तसंच, पश्चिम महाराष्ट्रातल्या घाटभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिकसह इतर काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा