डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा

येत्या 4-5 दिवसांत देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर तसंच ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये आणि उत्तर प्रदेशात; मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. उत्तर प्रदेशात आज, आणि 10-11 तारखेलाही तुरळक ठिकाणी, अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ओडिशामध्ये उद्या तर; आज आणि उद्या बिहारमध्ये; मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हवामान विभागाने आज नारंगी बावटा जारी केला आहे. आगामी 5 दिवसांत महाराष्ट्रातही अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. माथेरानमध्ये गेल्या 24 तासांत 22 सेंटीमीटर इतका-देशातला सर्वाधिक पाऊस झाला. 9 ते 11 जुलै दरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा